बी टाऊनमध्ये सध्या सेलिब्रिटींच्या मुला- मुलींचीच जास्त चर्चा आहे. यामध्ये सेलिब्रिटींच्या मुलींबद्दल म्हटलं तर सैफ अली खान, अमृता सिंगची मुलगी सारा आणि श्रीदेवी, बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर यांची नावं आघाडीवर आहे. अनेकदा या जिवलग मैत्रिणी एकत्र असताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी यांना टिपले आहे. त्यासोबतच या दोघींच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबतही खूप चर्चा आहेत. कधी बॉलिवूड पार्ट्यांमध्ये तर कधी जिममध्ये दोघी एकत्र असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकतंच या मैत्रिणींना मुंबई एअरपोर्टबाहेर एकत्र पाहिलं गेलं. यावेळी दोघींच्या कपड्यांमध्येही बरंच साम्य होतं. पांढऱ्या सलवार सूटमध्ये दोघीही खूप सुंदर दिसत होत्या. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीपासूनच दोघींच्या चाहत्यांचा एक मोठा वर्ग निर्माण झालाय. हिंदीतील बिग बजेट सिनेमांनाही दरदरून घाम फोडणाऱ्या नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवी भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. तर, सारा अली खान सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली असून ‘केदारनाथ’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यामुळे या दोघींच्या अभिनयकौशल्याबाबत स्पर्धा पाहायला मिळणार हे साहजिकच आहे.

PHOTO : ‘दिया और बाती हम’ फेम दीपिकाने शेअर केला मुलाचा पहिला फोटो

सारा आणि जान्हवीच्या मैत्रीसोबतच दोघींच्या अफेअरबद्दलही तितकीच चर्चा आहे. जान्हवीचं नाव शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तरसोबत तर सारा अली खानचं नाव हर्षवर्धन कपूरसोबत नाव जोडलं जात आहे. बी-टाऊनमधील अनेक मित्र-मैत्रिणींच्या जोड्या याआधीही विविध कारणांसाठी चर्चेत आल्या. शाहरूख-सलमानची मैत्री आणि त्यानंतरचा दोघांमधील वादही तितकाच पाहायला मिळाला. त्यामुळे सारा आणि जान्हवीची ही मैत्री बॉलिवूड पदार्पणानंतर कितपत टिकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.