बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेतही असते. इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनच्या माध्यमातून अनेकदा ती चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. आताही काहीसं असंच घडलं. साराच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर साराला प्रश्न विचारणाऱ्या चाहत्याला तिनं मजेदार अंदाजात उत्तर दिलं. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सारानं तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर नुकतंच एक प्रश्नोत्तरांचं सेशन घेतलं होतं. ज्यात तिला तिच्या चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले आणि त्याची सारानं उत्तरंही दिली. या सेशनच्या वेळी एका चाहत्यानं साराला, ‘वजन कमी करायचं असेल तर खरंच पिझ्झा खाणं सोडावं लागेल का?’ असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला सारानं हटके अंदाजात उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘तुम्ही थोडा खाऊ शकता पण संपूर्ण (सारा नहीं) नाही आणि अर्थातचं एवढा सगळा (इतना सारा) नाही.’
सारा अली खानची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान साराच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडेच तिचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आगामी काळात ती विकी कौशलसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. ज्याचं नाव अद्याप ठरलेलं नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केलं आहे. अलिकडेच सारा आणि विकीनं या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.