बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. पण यावेळी तिच्या मजेदार व्हिडीओमुळे ती चर्चेत आलेली नाही, तर यावेळी सारा फोटोग्राफर्सवर संतापली आहे. नुकताच साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
साराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत सारा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. सारा तिच्या शूटिंगच्या सेटवरुन बाहेर पडत असताना बाहेर फोटोग्राफर्सची गर्दी होते. यादरम्यान एकजण साराला धडकतो आणि त्यामुळे सारा पटकन गाडीत जाऊन बसते. त्यानंतर ती फोटो काढण्यासाठी पोज देत नाही. फोटोग्राफर्स फोटो काढण्यासाठी विनंती करतात यावेळी ती म्हणजे की “मग तुम्ही धक्का मारतात.” अशाप्रकारे वैतागल्याचा साराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी साराने शांतपणे फोटोग्राफर्सला उत्तर दिल्याने नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : ब्रेस्ट इम्प्लांटची थट्टा केल्याने करणवीर बोहरावर संतापली सायशा शिंदे, पाहा काय घडले…
आणखी वाचा : इब्राहिम अली खानसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर, पलक तिवारीने पहिल्यांदाच केले वक्तव्य म्हणाली…
दरम्यान, सारा सगळ्यात शेवटी अभिनेता (Akshay Kumar) अक्षय कुमार आणि )(Dhanush) धनुष यांच्यासोबत ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) या चित्रपटात दिसली होती. सारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित एका चित्रपटात लवकरच दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. याशिवाय ती (Vicky Kaushal) विकी कौशलसह देखील एक चित्रपट करत आहे, या चित्रपटाच्या सेटवरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर सारा ‘नखरेवाली’ आणि ‘गॅसलाइट’ चित्रपटातही दिसणार आहे.