गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सध्या सर्वत्र गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष होताना दिसत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खान, शिल्पा शेट्टीपासून ते शाहरुख खानपर्यंत सर्व सेलिब्रिटींनी आपापल्या घरी गणपतीचे स्वागत केले. दरम्यान, सैफ अली खान आणि अमृताची मुलगी सारा अली खानच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं होतं. साराने आई अमृता आणि बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र याच फोटोंमुळे तिला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
सारा अली खानने गणेश चतुर्थीच्या दिवशी इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अमृता आणि सारा बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. साराने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.’ आता काही ट्रोलर्सनी या फोटोंवरुन साराला ट्रोल केलं आहे. मुस्लीम असून गणेश पुजा केल्याने तिच्यावर टीका होताना दिसत आहे. काहींनी, ‘पैशांसाठी हिने धर्म विकला आहे.’ अशाप्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.
आणखी वाचा- “ही तर त्यांच्यापेक्षाही गरीब…” न्यासा देवगणचा Viral Video पाहून नेटकरी भडकले
सारा अली खानवर जोरदार टीका होत असली तरीही काही युजर्सनी तिला प्रोत्साहन दिले. ती समाजात एक चांगला संदेश देत असल्याचे म्हणत अनेक चाहत्यांनी तिची स्तुती केली. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिलं, ‘ट्रोलर्सच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.’ एवढेच नाही तर या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये युजर्स आपापसात भांडतानाही दिसले.
आणखी वाचा- सारा तेंडुलकर नाही तर सारा अली खानला डेट करतोय शुबमन गिल? फोटो होतोय व्हायरल
दरम्यान सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचं तर ती अक्षय कुमार आणि धनुष यांच्यासह ‘अतरंगी रे’मध्ये दिसली होती. अलीकडेच तिने विकी कौशलसह एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.