बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. साराने नुकतेच केदारनाथ मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सारने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. केदारनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर साराने हे फोटो काढले आहेत. यावेळी सारासोबत अभिनेत्री जान्हवी कपूर देखील एकत्र असल्याचे दिसतं आहे. सारने बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी काही फोटो हे केदारनाथचा तिचा प्रवास दाखवत आहेत. तर काही फोटोंमध्ये ती आणि जान्हवी हिमालयासमोर पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत ‘जिथे सुरुवात झाली तिथे परत’, अशा आशयाचे कॅप्शन साराने दिले आहे. साराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : “आता जायची वेळ आली आहे…”, अपघातापूर्वीचा अनसीचा ‘तो’ व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

साराचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र, तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘लाज वाटली पाहिजे तुला एक मुस्लीम असुन देवाचे दर्शन घेते.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आता इस्लाम धोक्यात येईल,’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी साराला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या ४८ व्या वाढदिवसाच्या बर्थडेपार्टीतील फोटो व्हायरल

सारा आणि जान्हवी कपूर या दोघांनी रणवीर सिंहचा ‘द बिग पिक्च’ या शोमध्ये हजेरी लावली आहे. साराचा ‘कूली नंबर १’ हा चित्रपट गेल्यावर्षी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होतो. तर, काही दिवसांपूर्वी सारा ‘अतरंगी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होती. या चित्रपटात सारासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धानूष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.