बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. साराचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या सारा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान, साराने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

साराने प्रमोशन दरम्यान तिच्या लहानपणीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. जो ऐकल्यानंतर प्रेक्षकांना हसू अनावर झाले आहे. साराच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘अतरंगी रे’ असल्याने तिला तू आयुष्यात अतरंगी अशी कोणती गोष्ट केली असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर साराने तिच्या लहानणीचा मजेशीर किस्सा सांगितला आहे. “एक अतरंगी गोष्ट आहे. जी मी लहानपणी केली होती. लहानपणी माझे आई-बाबा एका घड्याळाचा दुकानात गेले होते. ते दोघे खरेदी करण्यात गुंग असताना, मी बाहेर डान्स करत होते”, असं सारा म्हणाली.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

पुढे सारा म्हणाली, “मला खूप मज्जा येत होती. माझा भाऊ खूप लहान होता. तो जवळपास १ वर्षाचा होता. मी डान्स करत होते आणि एका माणसाने मला पैसे दिले. लोक खुष झाले आणि त्यांनी तिला भीक मागणारी मुलगी समजून पैसे दिले आणि मजेची गोष्ट म्हणजे ते पैसे मी माझ्याकडे ठेवले. डान्सतर केला होता. मग पैसे का परत करु म्हणून मी माझ्याकडे पैसे ठेवले.” हा किस्सा ऐकल्यावर सगळेच हसू लागले.

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

‘अतरंगी रे’ या चित्रपटात सारा धानुष आणि अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सारा रिंकू सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, धनुष विष्णूच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार रिंग मास्टर आहे, ज्याचं नाव अनिलच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अतरंगी रे’ या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. तर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader