बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैक एक आहे. करीना आणि सैफ यांच कुटुंब हे बॉलिवूडमधील सगळ्यात वेगळं कुटुंब आहे. या दोघांच लग्न होण्याआधी सैफला दोन मुलं होती. सारा अली खान आणि इब्राहम खान अशी त्याच्या मुलांची नावं आहेत. तर, अशा वेळेस करीनाचं तिच्या सावत्र मुलांसोबत म्हणजेच सारा आणि इब्राहम यांच्याशी नातं जोडणं खूप महत्त्वाचं होतं. एका मुलाखतीत साराने तिच्यात आणि करीनात असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं आहे.
सारा आणि सैफने दिग्दर्शक करणच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करणने साराला तिच्या आणि करीनाच्या नात्यावर प्रश्न विचारला. “करीनाला ती छोटी आई म्हणून हाक मारते का?” असा प्रश्न करणने साराला विचारला. त्यावर हसत सारा म्हणाली, “माझ्या वडिलांनी माझ्यावर कधीही करीना आमची दुसरी आई आहे असा दबाव टाकला नाही. ज्यामुळे आम्हाला असं काही वाटलंच नाही की आम्ही करिनाला आई म्हणून हाक मारावी. आई मी करीनाला छोटी आई म्हणून हाक मारली तर करीनाला धक्का बसेल. आणि ती म्हणेल काय? नाही. आणि मी करीनाला के किंवा करीना नावाने हाक मारते.”
View this post on Instagram
पुढे सारा म्हणाली, “आम्ही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहोत. जेव्हा करीना माझ्याशी पहिल्यांदा बोलली होती तेव्हा ती म्हणाली की, हे बघ तुझी आई खूप छान व्यक्ती आहे. मला फक्त तुझ्यासोबत मैत्री करायची आहे. तिने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी तिला छोटी आई वगैरे म्हणाली असती तर कदाचित ती स्वतःच माझ्यावर वैतागली असती.”
सैफ आणि करीनाने १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये लग्न केले होते. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर आहे. तर, दुसऱ्या नवाबचे नाव त्यांनी अजूनही सांगितले नाही.