अभिनेता अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अतरंगी रे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या २४ डिसेंबरला हा चित्रपट ओटाटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा अली खान आणि धनुष यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावली. यावेळी सारानं तिच्या स्वयंवरात विवाहित अभिनेत्यांना बोलवण्याची इच्छा व्यक्त केली.

‘कॉफी विथ करण’चा नवा प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहर, सारा आणि धनुष यांचं स्वागत करताना दिसत आहे. करण जोहरनं यावेळी सारा आणि धनुष यांना काही प्रश्न विचारले. ज्याची या दोघांनीही धम्माल उत्तरं दिली आहेत. करण धनुषला विचारतो, ‘जर एका सकाळी तू रजनीकांत म्हणून उठलास तर काय करशील?’ त्यावर धनुष म्हणतो, ‘मी कायमचा रजनीकांत होऊन राहणं पसंत करेन.’

करण जोहरनं साराला प्रश्न विचारले. तिला विचारण्यात आलेला प्रश्न हा तिच्या लग्नाशी संबंधित होता. करणनं सारा विचारलं, ‘तुझं स्वयंवर झालं तर त्यात तुला कोणत्या चार अभिनेत्यांना बोलवायची इच्छा आहे?’ करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना सारा म्हणाली, ‘रणवीर सिंह, विजय देवरकोंडा, विक्की कौशल आणि वरुण धवन.’ यावर करण म्हणतो, ‘मी आशा करतो की, या अभिनेत्यांच्या पत्नी देखील हा एपिसोड पाहत असतील.’ करणचं बोलणं ऐकून सारा लगेच उत्तरते, ‘आशा करते की, त्यांच्यासोबत त्यांचे पतीही हा एपिसोड पाहत असतील.’ साराचं बोलणं ऐकून करणसोबत धनुषही अवाक होतो.

सारानं ‘केदाराथ’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘अतरंगी रे’ हा तिचा ५ वा चित्रपट आहे. सारा अली खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘अतरंगी रे’ येत्या २४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे.

Story img Loader