अभिनेत्री सारा अली खान तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा व्हायरलही होताना दिसतात. आताही असंच काहीसं घडलंय. साराचे ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये सारा नवरीच्या वेशात क्रिकेट खेळताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सारा अली खानचं क्रिकेटशी तसं फार जुनं नातं आहे. तिचे आजोबा नवाब मन्सूर अली खान पटौदी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्धणार होते. क्रिकेट खेळण्याचं बालपणीचं स्वप्न मात्र अपूर्ण राहिल्याची खंत सारानं एका मुलाखतीत व्यक्त केली होती. पण आता सारानं ‘अतरंगी रे’च्या सेटवर सारानं क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

सारानं तिच्या इन्स्टाग्रामवर ‘अतरंगी रे’च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये सारा नवरीच्या वेशात हातात बॅट घेऊन क्रिकेट खेळताना दिसत आहे. साराचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सारानं ‘लव्ह आजकल’ प्रमोशनच्या वेळी सांगितलं होतं की, तिला क्रिकेटची आवड आहे मात्र बालपण तिचं वजन बरंच वाढलं होतं ज्यामुळे ती कधीच क्रिकेट खेळू शकली नव्हती.  

सारा अली खानची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘अतरंगी रे’ येत्या २४ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सारासोबत अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan played cricket on set of atrangi re photo goes viral on social media mrj