बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान इन्स्टाग्रामवर ‘नमस्ते दर्शको’ या सीरिजचे भन्नाट व्हिडीओ शेअर करीत असते. तिच्या या व्हिडीओला प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. साराचे हे व्हिडीओ इतके व्हायरल झालेत की, आता एका इन्स्टाग्राम क्रिएटरने साराची हुबेहूब नक्कल केली आहे. क्रिएटर धरना दुर्गाने शेअर केलेल्या व्हिडीओवर सारा अली खानने प्रतिक्रिया असून अभिनेत्रीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

हेही वाचा : ‘चुकीला माफी नाही’ नाट्यगृहात मोबाईल वापरणाऱ्या प्रेक्षकांना अमृता सुभाषने स्पष्टच सांगितले; म्हणाली, “कित्येकदा नाटक मध्येच…”

Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
Aashutosh Gokhle
आशुतोष गोखलेने ‘रंग माझा वेगळा’मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाला, “केमिस्ट्री अजूनही…”
Purva Kaushik
‘शिवा’ फेम पूर्वा कौशिकने ऑनस्क्रीन बहिणीबरोबर शेअर केले फोटो; म्हणाली…
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
Marathi actress Mitali Mayekar could not recognize her husband Siddharth Chandekar song
Video: मिताली मयेकर नवरा सिद्धार्थ चांदेकरचं गाणं ओळखू शकली नाही, म्हणाली, “आता घरी जाऊन फटके”
saif ali khan reached home after attack
सैफ अली खान रुग्णालयातून पाच दिवसांनी परतला घरी, हल्ला झाल्यानंतरचा अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आला समोर

सारा अली खानप्रमाणे प्रत्येक वाक्यात यमक जुळवणे, तिच्यासारखा पोशाख, लांब कानातले हे सगळं रिक्रिएट करीत प्रसिद्ध इन्स्टाग्राम क्रिएटर धरना दुर्गाने साराच्या ‘नमस्ते दर्शको’ सीरिजची हुबेहूब नक्कल केली आहे.

व्हिडीओत धरना दुर्गा, साराप्रमाणे प्रत्येक वाक्यात यमक जुळवत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला धरना बोलते, “नमस्ते दर्शको आज हम हैं लाल किला, यहा हमे बहुत इतिहास देखने को मिला…” तसेच व्हिडीओ शेअर करताना “दर्शको मेरे मुव्ही का ओव्हर हुआ वेट, जा कें देखो और देना सिर्फ प्यार नो हेट…” असे कॅप्शन धरनाने दिले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : कतरिना कैफने चित्रपटाचे कौतुक केल्यावर विकी कौशल झाला रोमॅंटिक; पत्नीसाठी शेअर केली खास पोस्ट

क्रिएटर धरना दुर्गाचा हा व्हिडीओ साराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करीत प्रतिक्रिया देताना “मला हे खूप आवडलंय…” असे म्हटले आहे. दुसरीकडे या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करीत “साराची अगदी हुबेहूब आणि सुंदर नक्कल तू केली आहेस” असे म्हणत धरनाचे कौतुक केले आहे.

साराने धरनाने शेअर केलेल्या या व्हिडीओची दखल घ्यावी म्हणून असंख्य नेटकऱ्यांनी साराला हा व्हिडीओ टॅग केला होता.

दरम्यान, अभिनेत्री सारा अली खानचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना विकी कौशल आणि सारा या नव्या ऑनस्क्रीन जोडीची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. चित्रपटाने रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी जवळपास ५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Story img Loader