सैफ अली खान- अमृता सिंगची मुलगी सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा या चित्रपटातील अभिनय समीक्षकांसह प्रेक्षकांनाही खूपच आवडला. त्यानंतर तिचा सिम्बा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील तिच्या अभिनयानेही प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यामुळे सध्या सारा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक झाली आहे. विशेष म्हणजे मोठ्या पडद्यावर झळकणारी सारा लवकरच छोट्या पडद्यावरही झळकणार आहे. सारा व्हिट या हेअर रिमुव्हर कंपनीची ब्रॅण्ड अम्बेसिडर झाली आहे.
‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’च्या यशानंतर साराकडे अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर आल्या असून तिने व्हिट या हेअर रिमुव्हर कंपनीची ऑफिर स्वीकारली आहे. त्यामुळे सारा लवकरच व्हिटच्या जाहिरातीमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूर या ब्रॅण्डची अॅम्बेसिडर होती.
दरम्यान, साराने स्वत: इन्स्टाग्रामवरुन याविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे. साराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने लवकरच व्हिटच्या जाहिरातीत झळकणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे साराचे चाहते तिला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.