बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. नुकतीच साराने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये साराने तिच्या आई-वडिलांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. ‘मला असे वाटायचे की माझे वडील चुकीची भाषा वापरत आहेत आणि आई पॉर्न साईट चालवते’ असे सारा म्हणाली.

‘मला आठवते मी लहान असताना ओमकारा आणि कलयूग हे चित्रपट पाहिले होते. माझ्या पालकांच्या चित्रपटांमधील भूमिका पाहून मी मानसिकदृष्टा खचून गेले होते. मी त्यावेळी लहान होते. सारखा विचार करायचे की माझे वडील चुकीची भाषा वापरतात आणि माझी आई पॉर्नसाईट चालवते… पण या चित्रपटांसाठी त्यांना बेस्ट निगेटीव्ह रोल अॅक्टरचा पुरस्कार मिळाला तेव्हा मला कळेना हे नक्की काय सुरु आहे’ असे सारा हसत हसत म्हणाली.

सैफ अली खानचा २००६मध्ये ओमकारा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने ईश्वर लंगडा त्यागीची भूमिका साकारली होती. तसेच या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, कोंकणा सेन शर्मा आणि विवेक ओबेरॉय हे मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर २००५मध्ये प्रदर्शित झालेल्या कलयूग चित्रपटात कुणाल खेमू मुख्य भूमिकेत होता. त्याचबरोबर अमृता सिंह, इम्रान हाश्मी, आशुतोष राणाने देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. हे सर्व चित्रपट पाहिल्यानंतर साराने ‘हर्पर बाजार’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बालपणीच्य आठवणी सांगितल्या आहेत.

पुढे सारा म्हणाली, “मी फार लहान असतानाच मॅच्युअर झाली. जेव्हा मी फक्त ९ वर्षांची होती तेव्हाच मला माझे पालक एकत्र आनंदी नाहीत, हे समजत होतं. मात्र ते दोघे जेव्हा विभक्त झाले, त्यानंतर ते दोघेही फार आनंदात राहू लागले. कदाचित माझी आई त्या १० वर्षात हसणंच विसरली होती. पण अचानक ती फार आनंदी राहू लागली. ती सुंदर दिसू लागली आणि जर माझे आई-वडील वेगळे होऊन आनंदात राहत असतील तर मग मी दु:खी का होऊ? मला त्यात काहीही अवघड वाटत नाही.”

Story img Loader