बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सारा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. साराला फिरण्याची प्रचंड आवड असून ती अनेकदा मंदिरात जाताना पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी साराने केदारनाथ मंदिरा जाऊन दर्शन घेतले होते. तर त्यापूर्वी ती महाकाल मंदिरातही दर्शनासाठी पोहोचली होती. फक्त मंदिर नव्हे तर सारा ही गुरुद्वारा, मशीद यासारख्या विविध प्रार्थनास्थळी दर्शनासाठी जाताना दिसते. विशेष म्हणजे या कारणावरुन साराला अनेकदा ट्रोलही केले जाते. पण नुकतच साराने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
सारा ही धर्म, जात यासारख्या गोष्टी मानत नाही. त्यामुळे अनेकदा तिने मंदिरात दर्शन घेतेवेळी, गुरुद्वारामध्ये दर्शन घेत असताना किंवा मशीदमध्ये नमाज पडतेवेळीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यावरुन अनेकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. मात्र सारा या कोणत्याही गोष्टींची पर्वा करत नाही. नुकतंच साराने ती या सर्व प्रार्थनास्थळी का जाते? त्याचे नेमके कारण काय? याबाबतचा खुलासा केला आहे.
साराने नुकतंच दैनिक भास्कर या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने याबाबत भाष्य केले. ‘शाहरुख खानने आपल्या मुलांना गीता, कुराण आणि बायबल शिकवले आहे. ती स्वतः महाकाल मंदिरात गेली आहे, मग ती स्वतःला धार्मिकदृष्ट्या किती समृद्ध करत आहे?’ असा प्रश्न साराला विचारण्यात आला. त्यावर साराने स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
“मी एखाद्या विशिष्ट धर्म किंवा जातीमुळे त्या ठिकाणी जात नाही. तर मी तिथे फक्त अध्यात्मासाठी जाते. मला तिथे असणारी सकारात्मक ऊर्जा आवडते. मग ती एखाद्या मंदिरातील असो, गुरुद्वारामधील असो किंवा एखाद्या चित्रपटाच्या सेटवरील लोकांकडून मिळणारी असो. मला लोकांमधील ती ऊर्जा आवडते. जी ऊर्जा कधी तिला मंदिरात तर कधी तिला दर्ग्यातून मिळते,” असे साराने म्हटले.
सारा अली खानला प्रवास करायला प्रचंड आवडते. तिने अनेकदा सुट्ट्यांदरम्यान परदेशात फिरण्यासाठी जाते. त्यासोबत कित्येकदा ती धार्मिक स्थळांनाही भेट देते. यापूर्वी साराने केदारनाथ, महाकाल, आसामच्या कामाख्या मंदिराचे दर्शन घेतले आहे. याचे अनेक फोटो तिने शेअर केले होते. विशेष म्हणजे गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये साराने राजस्थानमधील मेवाडमधील आराध्य श्रीएकलिंग नाथजी मंदिरालाही भेट दिली होती. यानंतर ती उदयपूर येथील नीमच मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती.
“माझे आणि यशचे नाते तुटणार होते पण…”, नुसरत जहाँ यांनी केला धक्कादायक खुलासा
मात्र तिच्या प्रत्येक धार्मिक स्थळाच्या भेटीवरुन तिला ट्रोल करण्यात आले. यातील काही नेटकऱ्यांनी तर सारा अली खानने तिच्या नावातून ‘खान’ हे आडनाव काढून टाकावे, असेही म्हटले होते.