बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानने २०१८ साली ‘केदारनाथ’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतरच्या ४ वर्षांत साराने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि तिच्या अभिनयात बराच बदल झालेला दिसून येत आहे. मागच्या काही वर्षांत तिच्या कामात सारानं या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सारानं बोल्डनेस आणि तिच्या आतापर्यंच्या करिअरवर भाष्य केलं.
सारा अली खानला अनेकदा तिच्या बोल्डनेसमुळे किंवा बिकिनी परिधान केल्यामिळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. पण यासोबतच तिच्या मंदिरात जाण्यावरही बरेचदा टीका होताना दिसते. सारा अली खान मशिदीत जाते आणि मंदिर आणि गुरुद्वारामध्येही जाते. सारानं नुकतंच ‘Elle India’ दिलेल्या मुलाखतीत, “मी अशी मुलगी आहे जी मंदिरातही जाते आणि बिकिनी देखील घालते” असं वक्तव्य केलं आहे.
सारा म्हणाली, “सारा अली खान सातत्याने विकसित होत आहे. ती शिकत आहे. सारा अशी मुलगी आहे जी मंदिरातही जाते आणि समुद्र किनाऱ्यावर बिकिनी देखील परिधान करते. ती तुमच्यासारखीच आहे जी शूटिंगच्या वेळी ४५ दिवस आईपासून दूर राहिल्यावर दुःखी होते. आईपासून दूर राहाणं तिला आवडत नाही. ती नेहमीच स्वतःला सरप्राइज देत असते.” साराची ही मुलाखत सध्या बरीच चर्चेत आहे.
दरम्यान सारा अली खानच्या करिअरबद्दल बोलायचं तर की लवकरच ‘गॅसलाइट’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित एका चित्रपटात दिसणार आहे. ज्याचं नाव अद्याप ठरलेलं नाही. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. तर ‘गॅसलाइट’मध्ये तिच्यासोबत विक्रांत मेस्सीची मुख्य भूमिका आहे.