बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. साराचे लाखो चाहते आहेत. नुकताच साराचा अतरंगी रे हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, साराचा भांगेत कुंकू लावलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर साराचा जो फोटो व्हायरल झाला आहे. त्यात भांगेत कुंकू लावलेल्या नवीन नवरीसारखी सारा दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अशी चर्चा सुरु झाली आहे की साराने गुप्त पद्धतीने लग्न केले आहे. जर तुम्ही ही असा विचार करत असाल तर व्हायरल झालेल्या फोटोत सारा विकी कौशलसोबत दिसत आहे. फोटोत साराने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर विकीने निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि लाल रंगाच जॅकेट परिधान केलं आहे. हा फोटो पाहिल्यानंतर असे दिसत आहे की, त्या दोघे नवरा-बायको आहेत. त्यांच्यासोबत या फोटोत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. यावर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्यांची जोडी चांगली दिसत असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : सिद्धार्थला एवढ्यात विसरलीस? साखरपुड्यातील शहनाजचा ‘सैराट’ डान्स पाहून आसिम रियाझ संतापला

आणखी वाचा : Big Boss Marathi 3 जिंकल्यानंतर विशाल निकम अडकणार लग्न बंधनात?

दरम्यान, सारा आणि विकीचा हा फोटो त्यांच्या आगामी चित्रपटातला आहे. या फोटोमध्ये सारा आणि विकी इंदोरच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. सारा आणि विकी लक्ष्मण उतेकर यांचा आगामी चित्रपट ‘लुका छिपी पार्ट २’ मध्ये दिसणार आहे. त्यांचा हा व्हायरल झालेला फोटो याच चित्रपटच्या सेटवरचा असू शकतो.