सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खानने खूप कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर ती लागोपाठ बड्या बॅनरसोबत काम करतेय. डेब्यू करण्यापूर्वी पासूनच तिचे लाखो फॅन्स होते. पण आता तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ झालीय. साराने आपल्या दमदार अभिनयाने फॅन्स मन जिंकण्यात कोणतीच कमी केली नाही. नुकतंच तिने वर्ल्ड इमोजी डे निमित्ताने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिने वेगवेगळे एक्सप्रेशन दिले आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

व्यक्तींच्या भावभावनांचे ज्या पद्धतीने वेगवेगळे इमोजी आहेत, अगदी हुबेहूब तसेच एक्सप्रेशन्स तिने या व्हिडीओमध्ये दिलेत. साराने तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा पसरलाय. या व्हिडीओला मिळालेल्या व्ह्यूजवरूनच व्हिडीओ तिच्या फॅन्सना किती आवडलाय याचा अंदाज येतोय. अवघ्या एका तासांतच या व्हिडीओला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर तिच्या फॅन्सनी कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केलाय. फक्त फॅन्सच नव्हे तर सेलिब्रिटींनी सुद्धा तिच्या या मजेदार व्हिडीओचं कौतुक केलंय.

सारा अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ‘अतरंगी रे’ चित्रपटातून भेटीला येणारेय. या चित्रपटात सारा अली खानसोबत अक्षय कुमार आणि धनुष सुद्धा झळकणार आहेत. चित्रपटांच्या व्यतिरिक्त सारा अली खानचे सोशल मीडियावर सुद्धा भरपूर फॅन्स आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जवळपास 33.5 मिलियन इतके फॅन्स तिला फॉलो करतात.