एकीकडे बॉलिवूडच्या विरोधात सोशल मीडियावर ‘बॉयकॉट’ ट्रेंड सुरू आहे. ज्यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या चित्रपटांना फार मोठा फटका बसताना दिसत आहे. तर अशातच दुसरीकडे सैफ अली खान आणि अमृता राव यांची लेक सारा अली खान एका व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सारा अली खान अडखळत चालताना दिसत आहे आणि याच व्हिडीओमध्ये तिने केलेल्या एका कृतीमुळे नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. साराच्या वागण्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूड कल्चरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सारा अली खान मुंबईच्या वरळी भागातील एका रेस्टॉरंटमधून बाहेर निघताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासह तिची मैत्रीण शर्मिन सहगलही दिसत आहे. यावेळी जेव्हा फोटोग्राफर्सनी साराचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती हसून तिथून काहीच न बोलता निघून जाताना दिसत आहे. एवढंच नाही तर शर्मिनही साराला लपवताना दिसत आहे. पुढे सारा दरवाजाजवळ उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकाचा आधार घेताना दिसते पण यावेळी तिने त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप सारावर होतोय.

आणखी वाचा- आमिर खानच्या लाडक्या लेकीला बॉयफ्रेंडने केले भर स्पर्धेत प्रपोझ; पहा व्हिडीओ

साराचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड कल्चरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. कारण या व्हिडीओमध्ये सारा अली खान नशेत असल्याचं दिसतंय असं अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर वरुण कपूर नावाच्या एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून त्याने लिहिलं, “आम्ही बॉयकॉट बॉलिवूड अभियान का सुरू केलंय असा अनेकांचा प्रश्न आहे ना? हे या मागचं कारण आहे. ड्रगीवूड आपल्या आगामी पीढीला चुकीचे आदर्श देण्याचा प्रयत्न करत आहे.” आपल्या या पोस्टमध्ये वरुणने मुंबई एसीबी आणि नार्कोटिक्स ब्यूरोलाही टॅग केलं आहे.

आणखी वाचा- सारा अली खानने सावत्र आई करीनाला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; फॅमिली फोटो शेअर करत म्हणाली…

सारा अली खानला या व्हायरल व्हिडीओवरून बरंच ट्रोल केलं जात आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी तिच्यावर सुरक्षारक्षकाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. तसेच असं वर्तन एका महिलेशी करण्यात आलं असतं कर त्या व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता. बिचाऱ्या सुरक्षारक्षकावर अन्याय होतं आहे असंही अनेकांनी व्हिडीओवर केलेल्या कमेंट्समध्ये म्हटलं आहे.