‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली सारा अल्पावधीत प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाली. तिचा खोडकर, हसरा आणि तितकाच प्रेमळ स्वभाव सगळ्यांना आवडला याच स्वभावामुळे तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वी अगदी बेधडकपणे तिनं कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल विचारण्यात आलं यावेळी सारानं आपण केवळ एकाच व्यक्तीच्या प्रेमात होतो आणि त्यानं मला कधीही दुखावलं नाही असं म्हणत न उलगडलेल्या नात्याचा पैलू उलगडला.

आपण काही वर्षांपूर्वी वीर पहाडियाला डेट करत असल्याचं फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत सारानं मान्य केलं. वीर ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. २०१६ मध्ये दोघंही रिलेशनशिपमध्ये होते मात्र या दोघांनी वर्षभरानंतर आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. मी फक्त एकाच व्यक्तीवर प्रेम केलं ती व्यक्ती म्हणजे वीर होय. त्यानं मला कधीही दुखावलं नाही. एका चांगल्या वळणावर आम्ही नातं संपवलं. मी आता सिंगल आहे आणि कोणालाही डेट करत नाही’ असं सारा या मुलाखतीत म्हणाली.

‘केदारनाथ’, ‘सिम्बा’ या चित्रपटातून सारा रुपेरी पडद्यावर झळकली. सध्या साराचं नाव सुशांत सिंह राजपुत याच्यासोबतही जोडलं गेलं आहे. ‘केदारनाथ’मध्ये सारानं सुशांतसोबत काम केलं होतं.

Story img Loader