रश्मिका मंदाना, कतरिना कैफनंतर भारताचा माजी फलंदाज भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या मुलीला सुद्धा काही दिवसांपूर्वी डीपफेक तंत्रज्ञानाचा फटका बसला होता. शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. मुळात हा फोटो साराने तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरबरोबर काढला होता. याबाबत साराने अधिकृतरित्या कोणतेही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आज इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याप्रकरणी तिने भाष्य केलं आहे.

सारा तिच्या पोस्टमध्ये लिहिते, “आपल्या सुख-दु:खांना वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही गोष्ट अतिशय चिंताजनक आहे. अशाप्रकारच्या फसवणुकीमुळे आपण वास्तवापासून दूर आभासी जगाकडे जात आहोत.”

हेही वाचा : Video : इंदू डार्लिंगचा वाढदिवस ते सात बायकांचं रियुनियन, ‘असा’ घडला ‘झिम्मा २’! चित्रपटाच्या शूटिंगचे न ऐकलेले किस्से…

सारा पुढे लिहिते, “माझा एक डीपफेक फोटो मध्यंतरी व्हायरल करण्यात आला होता. एक्सवर (ट्विटर) माझ्या नावाने एक अकाऊंट उघडण्यात आलं आहे. ज्याच्या बायोमध्ये हे अकाऊंट बनावट (पॅरोडी ) असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. तरीही माझ्या नावाचा वापर करून या अकाऊंटवरून विविध फोटो शेअर करण्यात येत आहेत. माझं एक्सवर अधिकृतपणे कोणतंही अकाऊंट नाही.”

“मला अपेक्षा आहे की, एक्स माझ्या तक्रारीची नोंद घेऊन या खोट्या अकाऊंटवर ताबडतोब कारवाई करेल.” अशी पोस्ट सारा तेंडुलकरने शेअर केली आहे.

हेही वाचा : सारा अली खानने एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! शेअर केले ‘लव्ह आजकल २’च्या सेटवरचे खास फोटो…

दरम्यान, डीपफेक हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले एक एआय टूल आहे. या डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ फोटो किंवा व्हिडीओ तयार करण्यात येतात. गेल्या काही महिन्यांपासून या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागला आहे.

Story img Loader