मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. अर्जुन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. अर्जुननं रणजी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच गोवा संघाकडून खेळत राजस्थान विरुद्ध शतकी खेळी केली आहेत.  विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरनेही ३४ वर्षांपूर्वी डिसेंबर १९८८ मध्ये रणजी सामन्यात गुजरातविरुद्ध शतक ठोकलं होतं. त्यामुळे सर्वत्र त्याच्या या खेळाचे कौतुक केले जात आहे. अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकरनेही त्याच्या या खेळाचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

अर्जुनच्या या कामगिरीबद्दल सारा तेंडुलकरला माहिती मिळताच ती फारच आनंदी झाली. तिने अर्जुनचे तोंडभरुन कौतुक केले आहे. साराने अर्जुनचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्यात तिने ‘तुझी बहीण असल्याचा मला गर्व आहे’, असे म्हटले आहे. त्याबरोबरच तिने पदार्पणावेळी शतकी खेळी केल्याचेही यात नमूद केले आहे.
आणखी वाचा : “३ वर्षात समजलेला लाईफ पार्टनर विरुद्ध ६ आठवड्यातला नवा चेहरा…” रोहितला माफ करण्याबद्दल रुचिरा जाधवचे स्पष्ट विधान

Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
sara tendulkar
सारा तेंडुलकर

त्यापुढे तिने आणखी एक फोटो शेअर करत त्याला मोठी बहीण म्हणून सल्लाही दिला आहे. “ही फक्त एक सुरुवात आहे. तुझी बहीण म्हणून मी नेहमीच तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिन, लव्ह यू क्यूटी”, असे तिने म्हटले आहे. तसेच “अर्जुन तू घेतलेली मेहनत फळाला आलीय”, असेही तिने एका फोटो कॅप्शन देताना म्हटले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

sara tendulkar 1
सारा तेंडुलकर

अर्जुन तेंडुलकरने मंगळवारी (१३ डिसेंबर २०२२) गोवा रणजी संघासाठी प्रथम श्रेणी सामना खेळला. मुंबईतून निवड झाल्यानंतर, तो लिस्ट ए आणि टी२० मध्ये संघासाठी खेळला पण गोवा संघासाठी त्याने प्रथम श्रेणी पदार्पण केले. यातील पहिल्याच सामन्यात त्याने दडपणाखाली येऊन अशी खेळी खेळली ज्यामुळे त्याचे पदार्पण संस्मरणीय ठरले. त्याने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १७८ चेंडू खेळून आपले शतक पूर्ण केले.

अर्जुन तेंडुलकरने या डावात सुयश प्रभुदेसाईसोबत २०० हून अधिक धावांची विक्रमी भागीदारीही केली. दोघांनी ३३३ चेंडूत २०० धावा जोडल्या, त्यात अर्जुनचे योगदान अधिक होते. विशेष म्हणजे अर्जुन तेंडुलकरने त्याचे वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. अर्जुनने आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात शतक झळकावले. यापूर्वी सचिनने डिसेंबर १९८८ मध्ये गुजरातविरुद्ध नाबाद १०० धावा केल्या होत्या. फरक एवढाच आहे की त्यावेळी सचिन फक्त १४ वर्षांचा होता, पण आता अर्जुन २३ वर्षांचा आहे.
आणखी वाचा : Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर वडिलांच्या वाटेवर, रणजी पदार्पणातच झळकावले शतक, १९८८ च्या पराक्रमाची पुनरावृत्ती

तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर हिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. एखाद्या हिरोईनला मागे टाकेल इतकं साराचं फॅन फॉलोईंग आहे. सारा ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. तिने अद्याप बॉलिवूडमध्ये एंट्री केलेली नसली तरी ती अनेकदा बॉलिवूड पार्टी, इव्हेंट्स आणि फॅशन शोजचा भाग असते. सारा तेंडुलकर सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.