मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी सारा तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते. सध्या साराने शेअर केलेल्या अशाच एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टद्वारे तिने सर्वांना तिच्या लंडनमधील उच्च शिक्षणाबद्दल माहिती दिली आहे.

साराचं शालेय शिक्षण मुंबईच्या ‘धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ मुंबई येथे झालं आहे. यानंतर साराने उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला. गेल्या काही वर्षांपासून सारा ‘कॉलेज ऑफ लंडन’मध्ये वैद्यकशास्त्राचं (मेडिसीन) शिक्षण घेत होती. या अभ्यासक्रमाचा निकाल आता विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे. साराने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे.

हेही वाचा : राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना यश चोप्रांनी खोलीत केलेलं बंद, अभिनेत्रीसमोर ठेवली होती फक्त एकच अट

सारा तेंडुलकर या कोर्समध्ये ७५ टक्क्यांहून (डिस्टिंक्शन) अधिक गुण मिळवत उत्तीर्ण झालेली आहे. तिने तिच्या निकालपत्राचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विषयात चांगला अभ्यास करुन करिअर घडवायचं हे साराचं आधीपासूनचं स्वप्न होतं.

हेही वाचा : Video : मुंबई सोडून महाबळेश्वरच्या शेतात रमली मृण्मयी देशपांडे! नवऱ्याबरोबर करतेय स्ट्रॉबेरीची लागवड, पाहा व्हिडीओ

sara tendulkar
सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, साराची आई अंजली तेंडुलकर देखील प्रोफेशनल डॉक्टर आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त गेल्या काही वर्षात साराने मॉडेलिंग क्षेत्रात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती सोशल मीडिया ब्लॉगर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. सारा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या परंतु, सचिनने त्या सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Story img Loader