‘सरस्वती’ ही मालिका सुरु झाल्यापासूनच प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे. यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. सरस्वती पासून सगळ्याच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. म्हणूनच या मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले आहेत. मालिकेमधील प्रेमळ, आपल्या पतीवर निस्वार्थीपणाने प्रेम करणारी, स्वच्छंदपणे आयुष्य जगणारी सरस्वती या मालिकेने सध्या प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर आहेत. तर या मालिकेचे दिग्दर्शन मंगेश कंथाळे यांनी केले आहेत. सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडे, आस्ताद काळे, संग्राम साळवी, माधव देवचक्के, सिध्देश्वर झडबुके, सुलेखा तळवळकर, पूजा नाईक, रसिक राज आणि सुनिल बर्वे या कलाकारांचा समावेश आहे.
या मालिकेतील सर्वच कलाकारांनी ३०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापला, आनंद व्यक्त केला जो आपल्याला त्यांच्या सेल्फीमधून दिसतोच आहे. या मालिकेतील सर्वच कलाकरांनी फोटोसेशन केले. कलाकारांनी सेल्फी आणि विविध प्रकारच्या पोझ देऊन पिक्चर्स काढले आणि मालिकेच्या ३०० एपिसोड पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.