कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती या मालिकमध्ये प्रेक्षकांना त्यांच्या लाडक्या सरस्वतीचा एक वेगळाच लुक बघायला मिळणार आहे. तितिक्षा म्हणजेच सरस्वती ही समंजस, साधी, मनमिळावू आणि सगळ्यांना जीवापाड प्रेम करणारी आणि सगळ्यांना आपल्या मधुर बोलण्याने आपलसं करणारी अशी व्यक्तिरेखा साकारत आहे. सरस्वतीने आपल्या कामाने आणि वेगळ्याच प्रकारच्या बोलण्याच्या अंदाजाने प्रेक्षकांना आपलस केल आहे. तिच्या अभिनयापासून तिच्या मंगळसूत्रापर्यंत सगळेच प्रेक्षकांना खूप आवडत. मालिकेमध्ये सरस्वती आणि मोठ्या मालकांच लग्न झाल्यापासून सरस्वतीचे मंगळसूत्र खूपच फेमस झाले. कारण, या मंगळसूत्रामध्ये असलेला वेगळेपणा लोकांना खूपच आवडला. आता सरस्वती मालिकेने तब्बल १ वर्ष पूर्ण केले आहे. प्रेक्षकांच अपार प्रेम अजूनही या मालिकेला मिळत आहे.
वाचा: ‘सरस्वती’ मालिकेत सर्जेराव चौधरीची एन्ट्री!
वाचा: सरस्वतीला मोठ्या मालकांकडून मिळाले गिफ्ट !
सरस्वती मालिकेमध्ये मोठ्या मालकांनी म्हणजेच राघवने सरस्वतीला सुंदर अश्या साड्या भेट म्हणून दिल्या आहेत. सारा घरी आल्यामुळे झालेल्या गैरसमजातून सरस्वती आणि राघवमध्ये दुरावा तुम्हाला मालिकेत पाहावयास मिळाले. मात्र, आता हा दुरावा कमी करण्यासाठी राघव प्रयत्न करत आहे. सरस्वतीला मनविण्यासाठी राघव ज्या साड्या आणि गळ्यातला नेकलेस सरस्वतीला भेट म्हणून देतो तोच आता सरस्वतीने घालायला सुरुवात केली आहे. या नवीन लुकमध्ये सरस्वती खूपच सुंदर दिसते आहे यात शंका नाही. प्रेक्षकांना देखील सरस्वतीचा हा लुक नक्कीच आवडेल.