झी मराठीवर २००८ मध्ये रंगलेल्या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोने आर्या आंबेकरला खरी ओळख मिळवून दिली. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी भाषेतील अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटांसाठी व नाटकांसाठी गाणी गायली आहेत. गोड गळ्यासोबत आर्याच्या सौंदर्याने देखील अनेकांना भुरळ घातली आहे.
ज्या शोने आर्याला ओळख मिळवून दिली त्याच शोमध्ये म्हणजेच ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मध्ये सध्या आर्या जजची भूमिका साकारत आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्या सिनेसृष्टीतील एका प्रसिद्ध गायक आणि संगितकाराला डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र आता आर्याने एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्ण विराम दिलाय. या पोस्टमध्ये आर्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. “आधी दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. मात्र माझ्या प्रश्नोत्तरांच्या सेशनमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. शिवाय काही ओळखीच्या व्यक्तीं त्याबद्दल काही गोष्टी बोलत असल्याचं कळालं. त्यामुळे स्पष्ट करण्याच ठरवलं” असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं.
हे देखील वाचा: ” ते माझा बलात्कार करतील अशी भीती होती”, अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ भयानक अनुभव
आर्याने एक फोटो शेअर करत सांगितलं, “गेल्या १२ वर्षांपासून कोणतीही टॅलेंट एजन्सी मला मॅनेज करत नाही. इंन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरील माझे सर्व फॉलोअर्स ऑर्गेनिक आहेत. तसचं यूट्यूबवरील सबस्क्रायबर आणि व्हूजदेखील ऑर्गेनिक आहेत. फॉलोअर्स, सबस्क्रायबर आणि व्हूवज् विकत घेण्याच्या संकल्पनेवर माझा विश्वास नाही आणि मी त्याच्या विरोधात आहे. ते माझ्या नैतिकते बसत नाही.” असं म्हणत आर्याने प्रमोशन किंवा कार्यक्रमांसाठी ती थेट संवाद साधत असून ती स्वत: सर्व मेल किंवा मेसेजेसला उत्तर देत असल्याचं स्पष्ट केलंय.
View this post on Instagram
पुढे आर्याने तिच्या पोस्टमध्ये सोशल मीडियावर तिला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोबतच आर्याने ती एका प्रसिद्ध गायक आणि संगितकाराला डेट करत असल्याच्या चर्चांवर उत्तर दिलंय. ती म्हणाली, ” मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छिते की ते माझे मार्गदर्शक आहेत. काहीही अफवा असल्या तरी मी त्यांचा कायम आदर करत आले आहे आणि करेल. मला त्याचं कौतुक वाटतं” असं आर्याने तिच्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
आर्याला तिच्या कुटुंबातूनच संगिताचा वारसा लाभला आहे. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. आर्याने आजवर अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. २०१७ सालामध्ये आलेल्या ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून तिने अभिनय कारकीर्दीस सुरुवात केली.