पापाराझी हा शब्द काही नवीन नाही. सेलिब्रिटींच्या नवीन लूकपासून ते आता कुठे आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला पापाराझींमुळे कळतात. पण सगळ्यांना नक्कीच कधी ना कधी हा प्रश्न आला असेल की आज सेलिब्रिटी कुठे जाणार आहेत? हे सगळं पापाराझीला कसं माहित असतं. याविषयी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सरगुन मेहतानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

सरगुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सगळ्यात आधी सरगुन पापाराझींना पाहून ते येणार आहेत हे माहित नसल्याचे नाटक करते आणि पुढे बोलते की “तुम्हाला कसं माहित की मी येथे आहे?” त्यानंतर पापाराझी तेथे येण्याआधीची एक क्लिप सरगुनने शेअर केली आहे. या क्लिपमध्ये सरगुन फोटोग्राफरला विचारते की “पॅप्स तुम्ही लोक आलात का?” त्यावर फोटोग्राफर बोलतो, “मॅडम अजून वेळ लागेल आम्हाला.” मग सरगुन बोलते, “मी पोहोचली रे.” पुढे फोटोग्राफर बोलतो, “मॅडम तुम्ही पेमेंट सुद्धा उशिरा करता.” हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत सरगुनने आपल्या सगळ्यांना पापाराझींना नक्की कसं माहित असतं की सेलिब्रिटी कुठे आहेत याविषयी माहिती दिली आहे.

आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट

पाहा व्हिडीओ

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

सरगुनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. पण काही नेटकऱ्यांनी सरगुनचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती यात उर्फीसारखी दिसते असं म्हटलं आहे. तर काहींनी अरे उर्फी नेहमीच असं करते असं म्हटलं आहे.

Story img Loader