लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकतंच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रवीण तरडे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांबद्दल भाष्य केले आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रवीण तरडे यांचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला त्यांनी दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांच्या तोडीचा आपला महाराष्ट्राचा महासिनेमा थिएटरमध्येच पाहूया! असे कॅप्शन दिले आहे.

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Abhijeet Guru
“लेखकांना मान कमी…”, अभिजीत गुरूने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

प्रवीण तरडे काय म्हणाले?

नमस्कार मी प्रविण विठ्ठल तरडे, तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअॅप ग्रुपवर किंवा मित्रमंडळीमध्ये हा व्हिडीओ नक्की शेअर करा. आपला सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट जगभर प्रदर्शित झालाय. आपली नेहमी ओरड असते की आपला चित्रपट साऊथच्या जोडीचा किंवा बॉलिवूडच्या जोडीचा का नाही. मित्रांनो सरसेनापती हंबीरराव तसाच बनला आहे. सर्व महाराष्ट्रात तुडूंब प्रतिसादात चालला आहे. पहिल्या तीन दिवसात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

मित्रांनो माझी या व्हिडीओद्वारे एकच विनंती आहे की, आपला चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा. तो टीव्हीवर पाहू किंवा व्हिडीओ लीक झाल्यावर पाहू, यात मजा नाही. आपला मराठी चित्रपट हा आपण चित्रपटगृहात जाऊन पाहिला पाहिजे. सोबत सहकुटुंबला घेऊन जा. चित्रपट पाहिल्यावर कमेंट करुन मला टॅग करा. तसेच बुक माय शो आणि IMDb वर रिव्ह्यू लिहा. यावरुनच इंटरनॅशनल पातळीवर चित्रपटाची किंमत ठरवते, असे प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे.

Sarsenapati Hambirrao Box Office Collection : ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, तीन दिवसात कमावले इतके कोटी

प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात विक्रमी कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ८.७१ कोटींची कमाई केली आहे. अनेक चित्रपट समीक्षक, प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. या चित्रपटात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रवीण तरडे साकारत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे.