लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकतंच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रोखठोक संवाद आणि जबरदस्त अ‍ॅक्शनमुळे यामुळे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन महान छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या सगळ्यात प्रवीण तरडेंनी नुकतीच एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत राज ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेंविषयी सांगितले आहे.

नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडेंना पत्रकाराने प्रश्न विचारला की “एक दिग्दर्शक आणि अभिनेत्याची राजकारणातील चित्रपट प्रेमी म्हणजे राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी महाराष्ट्राच्या आणि भारतीय सिनेमाविषयी काय चर्चा झाली?” यावर उत्तर देत प्रवीण तरडे म्हणाला, “आम्ही दीड-दोन तास गप्पा मारत होतो आणि राज साहेब फक्त चित्रपटांविषयी बोलत होते. मराठी चित्रपट त्याची पुढची वाटचाल, टेक्नॉलॉजी, व्हिएफेक्स, भाषेचे अडथळे, सबटायटल्स यात मराठी चित्रपट कसा टिकणार?”

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Rahul Gandhi Narendra Modi Gautam Adani (2)
VIDEO : संसदेच्या आवारात राहुल गांधींनी घेतली ‘मोदी-अदाणीं’ची मुलाखत? विरोधी खासदारांनीच घातले मुखवटे
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं पहिलंच दमदार भाषण, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!

आणखी वाचा : ‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं

आणखी वाचा : “तुझं सर्वात Best Reel…”, जिनिलियाचा शक्ती कपूर यांच्यासोबत धमाल डान्स व्हिडीओवर रितेशची कमेंट चर्चेत

पुढे प्रवीण तरडे म्हणाले, “राज साहेब पुढे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रपटांनी कसं स्वत: चं स्थान मिळवलं पाहिजे. कारण रोज ते एक चित्रपट पाहून झोपतात. महाराष्ट्राला ही एक परंपरा आहे…मग शरद पवार साहेब असतील, राज साहेब असतील, स्वत: बाळासाहेब ठाकरे हे चित्रपटाचे भक्त होते म्हणून कलाकारांवर त्यांचं प्रेम होतं. त्यामुळे राज साहेबांच्या बोलण्यात चित्रपटाचे कॅमेरा अॅंगल, लेनसेल अॅक्सेस यावर बोलत होते. यावेळी हंबीररावबद्दल त्याच्या भव्यतेबद्दल चर्चा झाली कारण त्यांनी टिझर आणि ट्रेलरवर चर्चा झाली आणि त्यांनी कौतुक केलं म्हणाले मराठी चित्रपट जर या दर्जाला येत असेल तर याचं भविष्य आणि वाटचाल खूप चांगली आहे.”

Story img Loader