‘सत ना गत’ या चित्रपटाला ‘कॅनडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’मध्ये ‘राइसिंग स्टार ऑफ २०१४’ ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. साई सागर इंटरनॅशनल फिल्म प्रस्तूत सत ना गत ह्या चित्रपटाचे निर्माते रेणुका मिटकरी, राजकुमार गुगळे आणि मनोज गुप्ता असून ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू पळसेकर ह्यांनी केले आहे.
कॅनडा फिल्म फेस्टिवलमध्ये ५०पेक्षा जास्त देशांनी भाग घेतला होता. तसेच, १०० हून अधिक चित्रपटांनी सहभाग घेतला होता. हा सोहळा २८ आणि २९ मार्च २०१४ रोजी कॅनडा मध्ये पार पडला. पुरस्कारासोबत ‘सत ना गत’ चित्रपटाला नवी मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये विशेष ज्युरी पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ऑस्कर पुरस्कार विजेता ‘नो मॅन्स लॅण्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शक मार्क बॅशेट यांच्या हस्ते देण्यात आला.

Story img Loader