|| पंकज भोसले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमेरिका ही महासत्ता आणि अतिप्रगत राष्ट्र म्हणून ओळखीची आहे. तिथल्या प्रागतिक विचारसरणीचे, आर्थिक सुबत्तेचे, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रयोगांचे आणि अर्थातच सुपरिचित सिनेसृष्टीचे आकर्षण जगभरातील राष्ट्रांना सारखेच आहे. तरीही दुरून साजऱ्या दिसणाऱ्या मोठाल्या अमेरिकेच्या अंतरंगात अनेक मागास परंपरा अस्तित्वात आहेत. उत्तर अमेरिकेतील काही भागांत आजही जारण-मारण तंत्रविद्यांचा वापर सुरू असून काळ्या जादूचे प्रस्थ अशिक्षितच नाही, तर सुशिक्षित उच्चभ्रू समाजामध्येही मोठय़ा प्रमाणावर अस्तित्वात आहे. साठ-सत्तरीच्या दशकांत एका बाजूला जेव्हा व्यक्तिवादी विचारसरणीचा पुरस्कार, मुक्त-स्वच्छंद जीवनशैलीचा अंगीकार आणि प्रवाहपतित जगण्याचा अविष्कार या समाजामध्ये तीव्रतेने पसरत होता, त्याच समांतर काळात सैतानपूजेच्या अघोरी मार्गानी आत्मसुख मिळविण्याचा प्रचार अमेरिकी पेपरबॅक कादंबऱ्यांमधून जोमाने होत होता. मायकेल डेल्व्हिंगच्या ‘डेव्हिल फाइंड्स वर्क’, जेम्स ब्लिशच्या ‘ब्लॅक इस्टर’, पीटर स्टॅफर्डच्या ‘द वाइल्ड विच’ या कादंबऱ्यांमध्ये आपल्याकडच्या भगत-मांत्रिकांच्या वरताण वातावरण आहे. सैतानी कारवायांची अद्भुत आणि विचित्र वर्णने आहेत. स्टीव्हन किंग ते गिलियन फ्लिनच्या आरंभिक कादंबऱ्यांमध्ये किंवा कित्येक बी-ग्रेड भयपटांमध्ये अमेरिकेच्या अघोरी बाजूचे संदर्भ सापडू शकतील. ताजे उदाहरण हवे असेल, तर चेल्सा स्टारडस्ट या दिग्दर्शिकेचा ‘सॅटनिक पॅनिक’ हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा. कारण तो यात चालणाऱ्या अघोरी बाजूला भीतीऐवजी विनोदाचा मारा करीत अधिकाधिका सुसह्य़ बनविण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटाला आरंभ होतो सामंथा ऊर्फ सॅम या प्रमुख व्यक्तिरेखेच्या पिझ्झा डिलिव्हरी गर्ल म्हणून काम सुरू करण्याच्या पहिल्या दिवसापासून. पैशांची तीव्र गरज असल्यामुळे तिने ही नोकरी पत्करलेली असते; पण तिची रवानगी ‘टिप’ न देण्यास प्रसिद्ध असलेल्या भागात सतत केली जात असल्याने दिवसभर पैशांऐवजी भरपूर अनुभवसंपत्तीच तिच्या गाठीस उरते. सॅमच्या वाटेला आलेली शेवटची पिझ्झा डिलिव्हरी गडगंज श्रीमंत परिसरात असल्यामुळे येथून तरी ‘टिप’ म्हणून काही अतिरिक्त पैसे हाती लागतील या आशेवर ती असते. अत्यंत गूढ आणि विचित्र भासणाऱ्या घरामध्ये ती पिझ्झा पोहोचता करते. येथेही हाती काही ठेवले जात नाही, म्हणून चिडते. ‘टिप’ हा आपला हक्क असल्याच्या थाटात ती त्या अवाढव्य घरात चोरपावलांनी शिरते. तिथे अत्यंत गुप्तपणे चाललेल्या सामूहिक सैतानपूजेच्या विधीमध्ये व्यत्यय आणून सर्वाचे लक्ष वेधून घेते. डॅनिका (रिबेका रॉमिन) हिच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली त्रितोंडी सैतानाला प्रसन्न करून परमोच्च सुखाचा मार्ग शोधण्यासाठी सुरू असलेल्या सोहळ्यात अनुरूप सॅमला बळी देण्यावर एकमत होते.
इथल्या घटना मोबाइल आणि आजच्या सगळ्या आधुनिक यंत्रणांची कुमक असताना घडत असल्या, तरी इथले जग हे सर्वसामान्य नाही. तंत्र-मंत्र यंत्राहून अधिक जोमाने कार्यरत राहणाऱ्या जगातील तर्कशास्त्राला अनुसरून इथल्या घटना घडताना दिसतात. डॅनिकाचे मंत्र, मानवी शरीरातून अवयव बाहेर काढून त्यांना आपल्या कामासाठी सक्रिय करण्याची हातोटी. तिला सर्वोच्च पदावरून खेचून म्होरकेपदासाठी आसुसलेली जिप्सी (आर्डेन मेरिन) हिच्या काही जणांना हाताशी घेऊन चालणाऱ्या कुरघोडी कारवाया यांमध्ये सैतानपूजेच्या महत्त्वाच्या विधीची प्रक्रिया सुरू राहते. ग्रेडी हॅण्ड्रिक्स या अमेरिकी भूत-प्रेतकथांच्या अभ्यासक लेखकाचा चित्रपटाच्या पटकथा लेखनात सहभाग असल्याने येथील साऱ्या घटनांमधील उग्र भाग हा चमत्कृतींनी भरलेला आहे.
जीव वाचविण्यासाठी सॅम त्या घरातील सुरक्षा कडे भेदून बाहेर पडते. शेजारच्या एका घरात आसरा मागते. तिथे तिला आणखी अघोरी कृत्यांचे दर्शन होते. तिथे ज्योडी (रुबी मोडायन) या डॅनिकाच्या मुलीशी सॅम मैत्री करते. ज्योडी आणि सॅम एकत्र असल्याचे डॅनिकाला समजल्यानंतर ती आपल्या मंत्रताफ्यासह सॅमला पकडण्यासाठी हजर होते. ज्योडी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. मात्र तिच्या जिवावरच सारे उलटते. आडमार्गाने काही क्षणांसाठी पंथाचा ताबा आलेली जिप्सी सॅम आणि ज्योडी या दोघांना मारण्याचे यत्न सुरू करते; पण पंथातील सर्वमंत्रज्ञानी डॅनिका लवकरच जिप्सीवर मात करीत पुन्हा सैतानी पूजेला आरंभ करते. आपल्या मुलीलाही सॅमसोबत बळी देण्यासाठी ती सज्ज होते.
ही कहाणी प्रगत अमेरिकेत घडते की भारतातील आसाममधल्या कुप्रसिद्ध मायोंगमध्ये हा प्रश्न त्यातील अनेक गोष्टींमुळे पडायला लागतो. भारतीय वामाचारी पंथाशी एकरूप असलेला इथला सोहळा आहे अन् आणखीही बऱ्याच गमती आहेत ज्या सगळ्यांना पटतील अशा नसल्या, तरी चित्रपटात अडकवून नक्की ठेवू शकतील