प्रसिद्ध लावणी नर्तिका गौतमी पाटील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. अशातच तिच्या आता अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. गौतमी पाटीलचे पुणे सोलापूर परिसरात अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असतात. तिच्या नृत्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिमा शेलार यांनी गौतमी आणि तिच्या नृत्यामधील अश्लीलतेच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
“घर बंदूक बिर्याणीमध्ये आर्ची दिसली नाही?” चाहत्याच्या प्रश्नावर नागराज मंजुळे म्हणाले…
तरुणाईमध्ये तिची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. मध्यंतरी गौतमीच्या एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे एका चाहत्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कार्यक्रमात चाहत्यांनी थेट स्टेजवर चढून धिंगाणा घातल्याचा प्रकारही घडला होता. या सर्व प्रकारांमुळेच आता गौतमीच्या लावणी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
गौतमी मूळची धुळ्याची सिंदखेडा येथील आहे. अर्ध्यावरच शिक्षण सोडून तिने आवड म्हणून डान्स शिकायला सुरुवात केली. अवघ्या ५०० रुपयांच्या मानधनावर सुरु झालेला गौतमीचा प्रवास आज लाखो रुपयांचा व्यवसाय ठरला आहे.