आगामी चित्रपट ‘सत्याग्रह’ प्रदर्शित होण्याची वेळ आणि राज्यांमध्ये होणा-या निवडणूका यांचा काहीही संबंध नसल्याचे निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा म्हणाले आहेत. चित्रपटाचा उद्देश्य लोकांचे मनोरंजन करणे असून चित्रपटामुळे जर कोणताही सामाजिक बदल येण्यास यश प्राप्त झाले तर तो आमच्यासाठी ‘बोनस’ असेल, असेही ते म्हणाले.
‘सत्याग्रह’ चित्रपटाची कथा अण्णा हजारे आणि निर्भया आंदोलनाशी मिळती जुळती आहे. तसेच, काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका असताना चित्रपट प्रदर्शित होत आहे, असे विचारले असता झा म्हणाले की, निवडणुकांच्या वेळेशी चित्रपटाचा काहीही संबंध नाही. बदल ही सतत चालू आणि स्थायी प्रक्रिया आहे. चित्रपट हे समाजाचा आरसा असून हा चित्रपट कोणत्याही एका विषयाशी जोडले नाही जाऊ शकत.
एका पित्याचे मुलाला गमवण्याचे दुःख आणि एका मुलाची पित्याला मिळवण्याची इच्छा यामधील द्वंद्व दाखविण्यात यात आले आहे. या द्वंद्वाशी समाज जोडला जाऊन आंदोलनाचे कसे रुप घेतो यावर ‘सत्याग्रह’ चित्रपटाची कथा आहे, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा