आगामी ‘सत्याग्रह’ चित्रपटाची कथा ही महात्मा गांधी आणि हजारे यांच्यावर आधारित नसली तरी हा चित्रपट त्यांची आठवण करुन देतो, असे दिग्दर्शक प्रकाश झा यांचे म्हणणे आहे. प्रकाश झा म्हणाले की, लोकशाहीमध्ये जगभरातील मध्यमवर्गीय लोक निषेध करतात. हा चित्रपट अण्णा हजारेंबद्दल नाही आहे. तसेच, त्यांनी केलेल्या निषेधाचीसुद्धा झलक यात नाही. मात्र, चित्रपटातील ‘निर्भया प्रकरण’ महात्मा गांधी आणि अण्णा हजारे यांची आठवण करुन देते.
अमिताभ बच्चन, अर्जुन रामपाल, अजय देवगन, मनोज बाजपेयी, करीना कपूर आणि अमृता राव यांनी चित्रपटातील ‘रघुपती राघव’ या गाण्याचे अनावरण केले. ‘लोकांच्या भावना लक्षात घेता ‘रघुपती राघव’ गाण्यात मुळ प्रार्थनेतील सुरुवातीच्या ओळींव्यतिरीक्त नवीन ओळींचा समावेश करण्यात आला आहे’, असे झा म्हणाले.
चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारणारी करिना म्हणाली की, माझी भूमिका कोणत्याही पत्रकाराशी प्रेरित नसून माझ्या भूमिकेत सन्मान आणि प्रामाणिकपणा आहे. पत्रकारांसारखे प्रश्न मला विचारता येणार नाहीत.
जनैतिक नाट्यावर आधारित असलेला ‘सत्याग्रह’ ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader