‘सत्याग्रह’ चित्रपटाचा सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे प्रकाश झा यांनी स्पष्ट केले. हा चित्रपट प्रामुख्याने वडील आणि मुलगा यांच्या नातेसंबंधावर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले.
झा म्हणाले, जरी चित्रपटात एका वयस्कर माणसाची आणि युवकाची व्यक्तिरेखा दाखविण्यात आली असली, तरी याचा अर्थ असा होत नाही की हा चित्रपट अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर आधारित आहे. चित्रपटातील वयस्कर व्यक्ती ही एक निवृत्त शिक्षक असून, त्याला पुत्रशोक झालेला आहे, तर चित्रपटातील युवकाने जीवनात खूप काही मिळवेले असून, तो एका वडीलधा-या माणसाच्या शोधात आहे.
चित्रपटातील अमिताभची व्यक्तीरेखा ही अण्णा हजारे यांची असून, अजय देवगणची व्यक्तीरेखा ही अरविंद केजरीवाल यांच्यावर आधारित आहे, अशी चर्चा माध्यमांमध्ये आहे. मागील तीन वर्षांपासून चित्रिकरण सुरू असलेला ‘सत्याग्रह’ हा चित्रपट विरोधासाठी प्रदर्शन करणा-या घटनांवर अवलंबून नसल्याचे झा सांगतात. भ्रष्टाचाराच्या विरोधातील प्रदर्शनात एक प्रकारची प्रेरणा असते. जगातील सर्व समाज विरोधासाठी केल्या गेलेल्या प्रदर्शनाच्या काळातून गेला आहे.  मग तो भारत असो बांगलादेश असो किंवा वॉल स्ट्रिट. हे सर्व प्रेरणादायी बनते, असे झा यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अर्जुन रामपाल, करिना कपूर, मनोज वाजपेयी आणि अमृता राव यांच्यासुद्धा भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा