प्रकाश झा यांचा राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट ‘सत्याग्रह’ चे ट्रेलर ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटादरम्यान दाखविले जाणार आहे. झा यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चनसह करीना कपूर, अजय देवगण, अमृता राव, अर्जुन रामपाल आणि मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे यूटीव्ही मोशन पिक्चर्स हे सहनिर्माते आहेत. अमृता रावने ट्विटरवर म्हंटले आहे की, ‘सत्याग्रह’ चे पहिले ट्रेलर या शुक्रवारी ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटादरम्यान दाखविले जाणार आहे. या आधी आलेल्या बातम्यांनुसार झा हे या चित्रपटाचे ट्रेलर जंतरमंतरवर दाखविण्यासाठी उत्सुक होते. ‘सत्याग्रह’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader