अभिनेता आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते-३’च्या पहिल्या प्रोमोचे अनावरण टि्वटर या सोशल मीडिया साईटवर होणार आहे. सुरुवातील हा व्हिडिओ फक्त टि्वटरवरच उपलब्ध करून देण्यात येईल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा प्रसिद्ध शो लवकरच स्टार प्लस वाहिनीवर सुरू होत आहे. गेल्या दोन पर्वांची सोशल मीडियावरील चर्चा लक्षात घेत, शोचे निर्माते आणि वाहिनीने टि्वटरवर प्रोमो उपलब्ध करून देत अनोख्या पद्धतीने दर्शकांना गुंतवून ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी टि्वटरच्या ‘फ्लोक टू अनलॉक’चा वापर पहिल्यांदाच करण्यात येत असून, सोशल मीडियावर शोची चर्चा वाढण्यासदेखील मदत होणार आहे. यासाठी चाहत्यांना flwcs.co/ON येथे जाऊन त्यांच्या टि्वटर लॉगिनमार्फत शोसंबंधीचे येथे देण्यात आलेले टि्वट पोस्ट करावे लागणार आहे. याठिकाणी देण्यात आलेला टक्केवारीचा बार १०० टक्क्यांपर्यंत पोहोचला की प्रोमोचा व्हिडिओ अनलॉक होऊन चाहत्यांना त्याचा आनंद लुटता येईल. ‘सत्यमेव जयते-३’शी निगडीत #MumkinHai या हॅशटॅगचा प्रचारदेखील याद्वारे शोकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Story img Loader