परफेक्शनिस्ट आमिर खानचा प्रसिद्ध शो सत्यमेव जयते आता मराठीतूनही प्रदर्शित होणार आहे. ज्या प्रेक्षकांना हिंदी भाषा कळत नाही त्यांच्यासाठी सत्यमेव जयते चे दुसरे पर्व तब्बल आठ भाषांमध्ये ध्वनिमुद्रीत (डब) करण्यात येणार आहे. देशातल्या ग्रामीण भागापर्यंत तसंच खालच्या स्तरापर्यंत प्रत्येक विषय पोहोचावा यासाठी हा प्रयोग करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.
हा कार्यक्रम मराठी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, तेलुगू अशा आठ भाषांमध्ये प्रसारीत होणार आहे. या पर्वासाठी आमिरने मराठी प्रोमो शूट केला आहे. मात्र, यात आमिरचा आवाज डब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader