बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट सत्यमेव जयते २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्यमेव जयते २ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर दमदार आणि अॅक्शनने भरलेला आहे.

जॉनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सत्यमेव जयते २ चा ट्रेलर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये जॉन ३ भूमिका साकारताना दिसत आहे. तर अभिनेत्री दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसत आहे. भारत मातेचे हे तीन वाघ, मीटवणार भ्रष्टाचार! ट्रेलर प्रदर्शित, असे कॅप्शन जॉनने हा ट्रेलर शेअर करत दिले आहे.

आणखी वाचा : शाहरुखनंतर गौरी खान आर्थर रोड तुरुंगात, मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी रवाना

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला जॉन अग्रेसिव्ह दिसतो. त्याचे एक-एक दमदार डायलॉग बोलत तो फाइट करताना दिसतो. तर दुसऱ्या सीनमध्ये जॉन कुर्ता आणि पायजम्यात असेंबलीमध्ये जात असल्याचे दिसते. त्यानंतर दिव्या खोसला कुमारची एण्ट्री होते. यानंतर जॉन एका पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसतो. एवढंच नाही तर यात नोरा फतेहीचा एक डान्स देखील आहे.

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

जॉन तीन भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गे मिलन जावेरी यांनी केले आहे. त्यासोबत या चित्रपटाची कहानी देखील त्यांनीच लिहिली आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader