नागरिकांच्या अभिरुचीविषयी समाजमाध्यमांवर चर्चा; आर्थिक गणिताचे कारण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ‘सावित्रीजोती’ या थोर समाजसेवक जोतिराव फु ले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील मालिकेला प्रेक्षकांच्या प्रतिसादाअभावी अध्र्यावरच निरोप घ्यावा लागल्याने समाजमाध्यमांमध्ये प्रेक्षकांच्या अभिरूचीविषयी उलटसुलट प्रतिक्रि या उमटत आहेत. तत्कालीन प्रतिकू ल परिस्थितीशी दोन हात करत ज्यांनी समाज घडवला, अशा इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचे महत्त्व आता कमी झाले आहे का, अशा शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टाळेबंदीनंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेलाही नियोजित वेळेच्या आधीच आटोपती घ्यावी लागली. त्यानंतर आता ‘सावित्रीजोती’. एकामागून एक बंद होणाऱ्या चरित्रात्मक मालिका प्रेक्षकांच्या अभिरूचीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.

‘फुले दाम्पत्याची जीवनगाथा मांडणारी ही पहिलीच मालिका होती. सोनी मराठी वाहिनी, दशमी निर्मिती संस्था यांची निर्मिती असलेल्या  या मालिके चे आणखी किमान १०० भाग बाकी होती. मालिके ने १८२७ला जोतीरावांचा जन्म झाल्यापासून साधारण वीस वर्षांचाच कालावधी पूर्ण केला गेला. अजून चाळीस वर्षांचा सामाजिक सुधारणेचा महत्वाचा कालखंड बाकी होता. त्यात सत्यशोधक समाजाची स्थापना, वेगवेगळ्या पुस्तकांचे लिखाण, महिलांसाठीच्या चळवळी हा क्रांतीचा खरा काळच निसटला आहे,’ अशी हळहळ नरके यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमावर सविस्तर लेखन करून त्यांनी प्रेक्षकांच्या अभिरूचीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित के ले. त्यांच्या या लेखनाला काही तासातच लाखोंचा प्रतिसाद लाभला. यात अनेक कलाकारांचाही समावेश आहे.

प्रेक्षकांना केवळ नवऱ्याचे लफडे, घरातल्या कुरघोडी यातच रस आहे की काय? अशी अभिरुची असेल तर नवे विषय आणण्यास निर्माते धजावणार नाहीत. विशेष म्हणजे महिला प्रेक्षक वर्गाकडून सावित्रीबाईंची मालिका पहिली न जाणे हे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रि या निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी दिली.

मालिकेचे निर्माते नितीन वैद्य सांगतात, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीजोती या दोन्ही मालिका ‘दशमी’नेच केल्या. या संस्थेसोबत सोनी मराठी आणि अभ्यासमंडळ यांनी मालिकेसाठी जीव ओतून काम केले.

कलाकारांनी भूमिके ला पुरेपूर न्याय दिला. एक उत्तम कलाकृती घडलेली असतानाही केवळ लोकांचा प्रतिसाद कमी पडला म्हणून ती बंद करावी लागत आहे. करोनाचा फटका वाहिन्यांनाही बसला.