क्रिकेट आणि बॉलिवूडचं एक वेगळंच कनेक्शन आहे. मात्र, या वेळी क्रिकेटचं कनेक्शन हे बॉलिवूडशी नाही तर मराठी चित्रपटसृष्टीशी जोडण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, आयपीएल २०२१ आता अंतिम टप्प्यात असताना सायलीच्या पोस्टवर कमेंट करत एका नेटकऱ्याने तिला सल्ला दिला आहे.
आयपीएलची अंतिम सामना हा चैन्नई सुपर किंग्जची अखेरची लढत कोलकाता नाइट रायडर्स या संघासोबत आहे. हा सामना १५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. तर सध्या सीएसकेचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड चांगल्या फार्ममध्ये आहे. आता सायलीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर तिच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी कमेंट करक तिला एक सल्ला दिला आहे.
सायलीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. या फोटोत सायलीने चिकणकरी डिझाईनचा कुर्ता परिधान केला आहे. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “ऋतुचा राज.” दुसरा नेटकरी म्हणाला, “ऋतुराज तुमचा कोण लागतो सांगा.” तिसरा नेटकरी म्हणाला, “तू आणि ऋतुराज रिलेशनशिपमध्ये आहात का?” आणखी एक नेटकरी म्हणाला, “ऋतुची राणी.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने तिला सल्ला दिला आहे, “जरा दोन दिवस पोस्ट अपलोड करू नको, आयपीएल फायनल मध्ये ऋतुराजचे शतक हुकेल तुमच्या पोस्ट मुळे.”

आणखी वाचा : “जेव्हा माझ्या ११ वर्षाच्या मुलाचे निधन झाले तेव्हा शाहरूख…”, शेखर सुमनचे ट्वीट व्हायरल
ऋतुराजनं राजस्थान विरुद्ध शतक झळकावलं आहे. तर यंदाच्या सिझनमध्ये त्यानं चार अर्धशतकं झळकावली आहेत. ऋतुराज सर्वाधिक सिक्सर मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच युएईमध्ये ऋतुराजने सर्वात अधिकवेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे, १४ व्या हंगामात केकेआरसोबत होणाऱ्या सीएसकेच्या अंतिम लढतीत सर्वांचे लक्ष ऋतुराजच्या खेळीकडे आहे.