मराठी चित्रपटसृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. काही दिया परदेस या मालिकेतून सायली घराघरात पोहोचली. सौंदर्य आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर सायलीने सिनेसृष्टीत तिचे अढळ स्थान निर्माण केले आहे. सायलीने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कायमच कौतुक होत असते. आता लवकरच ती एका ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. या निमित्ताने तिने झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बस बाई बस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमावेळी तिने अनेक गोष्टींवर भाष्य केले. चित्रपट, मालिका, तसेच तिचे खासगी आयुष्य याबद्दलही सायली संजीवने सांगितले. यावेळी सुबोध भावेने तुला एखाद्या बोल्डसाठी विचारणा झालीय का? असा प्रश्न तिला विचारला. त्यावर तिने स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” सायली संजीवने ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांवर मौन सोडले

यावर उत्तर देताना सायली संजीव म्हणाली, ‘हो… चित्रपटासाठी नाही, एका वेबसीरिजसाठी मला विचारलं होतं. पण तेव्हा मी नाही म्हणाले’. त्यावर सुबोध भावेने बोल्ड होती म्हणून की वेळ नव्हता म्हणून, असा प्रश्न विचारला.
आणखी वाचा : “राज काका तुमचे विचार…” सायली संजीवने व्यक्त केली मनातील भावना

“दोन्हीही मी एखादी बोल्ड भूमिका करण्यासाठी तयार नाही, असं मला वाटतं. मी थोडंस माझ्या प्रेक्षकांचा विचार करते. कारण माझे जे प्रेक्षक आहे, चाहते आहेत. त्यांनी मला जसं पसंत केलंय, तेवढं जास्तीत जास्त मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मी त्या सर्व गोष्टींना धरुन काम करण्याचा त्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करते. माझ्या नशिबाने मला तशाच भूमिका मिळतात. माझ्याकडे आतापर्यंत एखाद दुसरी बोल्ड भूमिका आली आहे. पण मला असं वाटतं की मी अजूनही ते करायला तयार नाही”, असेही सायली संजीव म्हणाली.

आणखी वाचा : “आईचा हट्ट, लग्नाची मागणी ते साखरपुडा…” ‘अशी’ सुरु झाली राणादा आणि पाठकबाईंची लव्हस्टोरी

दरम्यान काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या झिम्मा या चित्रपटात सायलीने थोडी हटके भूमिका साकरण्यावर भर दिला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील बोल्ड अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या तिने अंघोळ करतानाचे एक दृश्य दाखवण्यात आले होते. यात सायली बोल्ड अंदाजात दिसली होती. त्यानंतर सायलीच्या बोल्ड सीनची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sayali sanjeev said i was asked for bold movie scean but i am not ready nrp