करिना आणि प्रियांका या दोन सौंदर्यवतींच्या प्रेमसंबंधांनंतर आता अभिनेत्रींसोबत डेटिंग करण्याची भीती वाटत असल्याचे शाहीदने म्हटले आहे. कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये शाहीद आणि सोनाक्षी सिन्हा आले होते.
करण जोहरने शाहीदला कोणत्या अभिनेत्रीला डेट करायला आवडेल असे विचारले असता त्याने लगेचच प्रत्युत्तर दिले, अभिनेत्रीसोबत तर नक्कीच नाही…. त्यांचा आता कंटाळा आला आहे मला. अभिनेत्रींसोबत डेटींग करण्याची मला भीती वाटू लागली आहे. त्यावर अभिनेत्रींसोबत डेटींग करून तू काय शिकलास? असा प्रश्न करणने केला. तेव्हा त्यांना डेट करू नका, हा धडा मिळाल्याचे शाहीदने सांगितले. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री नर्गिस फाखरी व हुमा कुरेशी यांच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले होते. मात्र, आपण सध्या तरी सिंगलच असल्याचे त्याने करणच्या शोमध्ये स्पष्ट केल्याने त्याच्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scared of dating actresses shahid kapoor