‘द अव्हेंजर्स’, ‘कॅ प्टन अमेरिका’, ‘हिचकॉक’, ‘आयर्न मॅन २’ सारख्या हॉलिवूडपटांमधून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सन सध्या गुलाबजामच्या जाम प्रेमात आहे. तिला हा अस्सल भारतीय गोड पदार्थ इतका आवडला आहे की, भेटेल त्याच्याकडे ती गुलाबजामची तोंडभरून स्तुती करते आहे!
त्याचे असे झाले की, ‘आयर्न मॅन’चा दिग्दर्शक जॉन फेरावू सध्या ‘शेफ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. या चित्रपटात स्कार्लेट भूमिका हॉटेल मॅनेजरच्या भूमिकेत आहे. ‘शेफ’च्या चित्रिकरणादरम्यान वेगवेगळ्या पाककृती सेटवर बनवण्यात आल्या होत्या. त्यात भारतीय खाद्यपदार्थाचा मोठय़ा प्रमाणात सहभाग होता. अर्थातच भूमिकेच्या मागणीनुसार स्कार्लेटला या प्रत्येक पदार्थाची चव चाखायला मिळाली. आणि आश्चर्य म्हणजे ती गुलाबजामच्या प्रेमातच पडली.
आयुष्यात प्रथमच एवढा गोड आणि सुंदर पदार्थ चाखायला मिळाला असल्याचे सांगत स्कार्लेटने सेटवरचे सगळेच गुलाबजाम फस्त केले. अर्थात सेटवर उपस्थित असलेल्या इतरांनाही तिने थोडाथोडा गुलाबजाम चाखायला दिला. मात्र, तिचे गुलाबजामप्रेम एवढय़ावरच थांबले नाही तर गुलाबजामची महती ती प्रत्येकाला सांगत सुटली आहे. ‘शेफ’ चित्रपटात स्कार्लेटबरोबरच ‘आयर्न मॅन’ अभिनेता रॉबर्ट डाऊनी पुन्हा एकत्र काम करणार आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
thipkyanchi rangoli fame Namrata Pradhan sister gunjan Pradhan will get marry
‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
manasi moghe marathi actress announces pregnancy
मराठमोळी अभिनेत्री लवकरच होणार आई! नवरा आहे लोकप्रिय हिंदी अभिनेता, २०१३ मध्ये झालेली मिस Diva युनिव्हर्स
Story img Loader