‘मद्रास कॅफे’ चित्रपटाचा स्टार जॉन अब्राहम नसून, चित्रपटाची पटकथा असल्याचे शूजित सिरकरचे म्हणणे आहे. जॉन या (गुप्तहेरपटात) चित्रपटात प्रमुख भूमिका करत आहे.
शूजित  म्हणाला, या चित्रपटाबद्दल मी समाधानी असून, चित्रपटाच्या पटकथेला मी महत्त्वपूर्ण मानतो आणि चित्रपटात देखील जॉन स्टार नसून चित्रपटाची कथा स्टार आहे. फक्त सलमान खानच्या चित्रपटांमध्ये असे नसते.
या चित्रपटात रॉ एजंटची भूमिका करत असलेल्या जॉनने शूजितबरोबर चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. ‘विकी डोनर’च्या सफलतेनंतर एकत्रित असा हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे.
जॉन आणि मी आमच्या प्रत्येक चित्रपटासाठी एका टीमसारखे काम करतो. आम्ही असा एक माहोल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत की, ज्यात चित्रपटाचा विषय महत्वाचा असेल. आमचा चित्रपट त्याच्या विषयाच्या जोरावर चालतो. ‘मद्रास कॅफे’मध्ये मी जॉनला एक सर्वसाधारण व्यक्तीच्या स्वरूपात दाखविले असल्याचे शूजितने सांगितले.
२३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची तुलना हॉलिवूडमधील ऑस्कर विजेत्या ‘आर्गो’ या चित्रपटाशी केली जात आहे. याशिवाय या चित्रपटाची तुलना हॉलिवूडमधल्या ‘बॉडी ऑफ लाय’ चित्रपटाशी आणि जेम्स बॉन्डच्या चित्रपटांच्या मालिकेशी केली जात असली, तरी शूजित ने याचे खंडण केले आहे.

Story img Loader