सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण पुरस्कार सोहळा सुरु होण्याआधी अभिनेता शॉन पेनने ऑस्कर आयोजकांना चेतावनी दिली होती. त्याने मागणी केली होती की या सोहळ्यात युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनाही आमंत्रण द्यायला हवे होते, नाही तर तो ऑस्कर पुरस्कार वितळवेल.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, “मी प्रत्येकाला या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करेन. हा त्या सगळ्यांचा क्षण असू शकतो, हीच वेळ आहे त्यांच्या चित्रपटांविषयी बोलण्याची, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे. युक्रेनच्या लोकांसोबत उभे रहा. माझ्यावर वेळ आली तर मी स्वत: हा पुरस्कार परत करेन आणि सगळ्या लोकांसमोर पुरस्काराला वितळवेन.”
आणखी वाचा : या चित्रात तुम्ही सगळ्यात आधी काय पाहिले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी ऑस्करच्या आयोजकांना त्यांना सोहळ्यात बोलण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले होते. या सोहळ्याच्या माध्यमातून रशियाविरुद्ध युक्रेनच्या बाजूने आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवायचा असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण ऑस्कर सोहळ्याच्या आयोजकांनी झेलेन्स्की यांची ही मागणी नाकारली.
शॉनला दोनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. ‘मिल्क’ आणि ‘मिस्टिक रिव्हर’साठी त्याला हा पुरस्कार मिळाला होता. अलीकडेच त्याने रशिया-युक्रेन युद्धावर एक डॉक्युमेंटरी शूट केली आहे. युक्रेनमधून परतताना त्याने खुलासा केला होता की, रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर तो चालतं पोलंडला गेला.