शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मनोरंजन क्षेत्रात नसली तरीही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांशी संपर्कात राहणं तिला आवडतं. अलीकडे मीराने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेला एक फोटो चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे विमानतळावर सामान तपासणीदरम्यान तिला अडवण्यात आलं. तिच्या बॅगेत अशी वस्तू सापडली की,सुरक्षा रक्षकही चक्रावले.
ख्रिसमसच्या निमित्ताने मीरा राजपूत तिच्या आईला भेटायला जात होती. मीरा विमानतळावर पोहोचताच सुरक्षा रक्षकाने तिला थांबवले. तिच्याकडे असलेलं सामान तिने स्कॅनिंग करण्यासाठी पाठवल्यावर तिच्या बॅगमध्ये एक संशयास्पद वस्तू तेथील सुरक्षारक्षकांनी पाहिली. त्यामुळे तिला विमानतळावरच तिची ती बॅग उघडून दाखवावी लागली. पण तिच्या बॅगमधली संशयास्पद वस्तू पाहून सुरक्षरक्षकांना धक्काच बसला.
आणखी वाचा : Video: “नाही, मी तर…” शाहरुखला ‘तृतीयपंथी’ म्हणणाऱ्याला किंग खानचं सडेतोड उत्तर
त्यांनी मीराच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यातून कोबीच्या लोणच्याची बरणी निघाली. हे पाहून तेथील अधिकारीही हसले आणि मग मीराला त्यांनी जाऊ दिलं. हा किस्सा मीराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीरा राजपूतने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लोणच्याच्या बंद बरणीचा फोटो शेअर केला आणि लिहिलं, “जेव्हा विमानतळावरील सुरक्षारक्षक तुम्हाला घरी बनवलेले अन्न पदार्थ नेण्यासाठी अडवतात…हे कोबीचं लोणचं आहे. हे पाहून लोकांना कळतं की तुम्ही पंजाबी आहात. यानंतर अधिकारी हसू लागले आणि म्हणाले, “तिला जाऊ द्या.”
हेही वाचा : Video: मीराला बघताच शाहिद कपूरमधील कबीर सिंग झाला जागा; त्रासलेली पत्नी म्हणाली…
मीरा कपूरचा ख्रिसमस आनंदाने भरलेला होता. ख्रिसमसनिमित्त ती तिच्या आईकडे गेली होती. या खास दिवशी मीराने शाहिदसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या आणि माझ्या सांताकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा. आमची दोन्ही मुलं त्यांच्या भेटवस्तू बघण्यात व्यस्त आहेत.” मीराच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला होता.