बॉलिवूड अभिनेत्री रश्मी आगडेकर तिच्या अभिनय कौशल्यामुळे ओखळली जाते. रश्मीने अनेक वेब सीरिज आणि चित्रपटात काम केले आहे. रश्मीने लेस्बियन पासून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. या वर्षी “जागतिक महिला दिनाच्या” निमित्ताने रश्मीने स्वत: चे मत मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रश्मीने जागतिक महिला दिनाचा काय अर्थ होतो आणि महिलांविषयी चित्रपटात तिने काय बदल घडवून आणले ते व्यक्त केलं आहे. “आतापर्यंत महिला दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातील महिलांचा उत्सव साजरा करणे. पण यावर्षी मी स्वतःसाठी ही काही तरी करणार आहे. म्हणून हा दिवस मला माझी सामर्थ्य आणि माझ्यातली कमी यांचे स्मरण करण्याचे कारण बनत आहे. मी स्वत: ला कशा प्रकारे चांगलं करू आणि जगासाठी माझे योगदान कसे देऊ शकते ह्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. जग आता बदलले आहे आणि ते चित्रपट क्षेत्रात दिसून येत आहे. आता स्त्रियांसाठी खूप चांगल्या भूमिका बनत असून प्रेक्षक त्या स्वीकारत सुद्धा आहे. तुमच्या आयुष्यात बर्‍याच स्त्रिया आहेत, ज्या प्रत्येक चरणात अशा महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, आणि ते मोठया पडद्यावर सुद्धा दर्शविले जात आहे.”

रश्मीची नुकतीच “देव डीडी २” ही सीरिजची काही दिवसांपुर्वी प्रकाशित झाली. ही वेब सीरिज ऑल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. रश्मीने या आधी ‘अंधाधुन’, ‘देव डीडी २’, ‘रसभारी’ आणि ‘द इंटर्न्स’ सारख्या अनेक चित्रपटातून सगळ्यांची मने जिंकली आहेत.