नवविवाहीत जोडपे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांना समुद्रकिनारी सुटीचा आनंद घेणे नेहमीच आवडते. दोघांनी आपल्या हनिमूनसाठी देखील सुंदर समुद्रकिनारे असलेल्या ठिकाणालाच पसंती दिली. बिपाशा आणि करण हनिमूनसाठी मालदिवला गेले असून, तेथील काही छायाचित्रे बिपाशाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली आहेत.
समुद्रकिनारी बसलेल्या करणचे एक छायाचित्र पोस्ट करून बिपाशाने मालदिवच्या नयनरम्य समुद्रकिनाऱयाचा एक व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याशिवाय, दोघांनी मालदिवमध्ये दाखल होताच एक वेलकम केक देखील कापला. त्याचेही छायाचित्र बिपाशाने पोस्ट केले आहे. मग करणनेही बिपाशाचा समुद्रकिनारी टीपलेला हॉट फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला.
The sweetest welcome cake❤️ Thank you #jumeiravittaveli
A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on
A photo posted by bipashabasu (@bipashabasu) on