मराठी सिनेसृष्टीतली शालीन अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या सीमा देव यांचं आज दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. अभिनय देव यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं मागच्या वर्षी निधन झालं. त्यानंतर आज सीमा देव यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. रमेश देव यांच्या बहिणीचं काम त्यांनी आलिया भोगासी या सिनेमात केलं होतं. त्यानंतर मात्र या दोघांनी इतर सिनेमांमध्येही भूमिका केल्या. तसंच पडद्यावर एकेकाळी बहीण भावाचा अभिनय करणारे हे दोघे नंतर खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार झाले. २०१३ मध्ये त्यांनी लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला होता. आज सीमा देव यांच्या जाण्याने एक पर्व संपल्याची भावना प्रत्येक सिने रसिकाच्या मनात आहे.

रमेश देव आणि सीमा देव यांची प्रेमकहाणी कशी आहे?

रमेश देव हे सीमा देव यांच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठे होते. रमेश देव हे मूळचे कोल्हापूरचे. ५० च्या दशकात त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. सुरुवातीला ते अनेक लहान भूमिका करत होते ज्यात प्रामुख्याने नकारात्मक भूमिका साकारत होते. सीमा देव यांचं पूर्वाश्रमीचं नाव नलिनी सराफ असं होतं. १९५७ मध्ये आलेला आलिया भोगासी हा सीमा देव यांचा पहिला सिनेमा होता. तर रमेश देव आणि सीमा देव यांनी काम केलेला जगाच्या पाठीवर हा सिनेमा या दोघांचा पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. त्यानंतर या दोघांची जोडी वर दक्षिणा या सिनेमातही दिसली. हा सिनेमा हुंडा पद्धतीला विरोध दर्शवणारा होता. एकत्र काम करता करता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आयुष्यभराचे जोडीदार झाले. १ जुलै १९६३ या दिवशी रमेश देव आणि नलिनी सराफ यांचा विवाह झाला. त्यानंतर नलिनी सराफ यांचं नाव सीमा देव हे झालं ते कायमचंच.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
after Devendra Fadnavis elected as cm Nagpur is waiting for Devendra fadnavis Arrival at Ramgiri
‘रामगिरी’ला ‘देवा’भाऊची प्रतीक्षा; आता लवकर या…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Chennamaneni Ramesh BRS MLA
Chennamaneni Ramesh: भारतीय नागरिकत्व रद्द झालेले देशातील पहिले आमदार; कोण आहेत चेन्नमनेनी रमेश?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”

रमेश देव आणि सीमा देव यांच्या लग्नाला २०१३ मध्ये ५० वर्षे पूर्ण

२०१३ मध्ये त्यांनी लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला अनिल कपूर, हेमा मालिनी, नितीन देसाई यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार आले होते. याच लग्नाच्या वाढदिवशी रमेश देव असं म्हणाले होते की आमच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. माझे सूर सीमाबरोबर खूप चांगल्या पद्धतीने जुळले. आम्ही अभिनय करतानाही नैसर्गिक वाटलो कारण आमची ऑफ स्क्रीन केमिस्ट्रीही चांगली होती. सध्या आमच्यापेक्षा जुनं जोडपं कुणी सिनेसृष्टीत आहे असं मला वाटत नाही असंही रमेश देव यांनी तेव्हा म्हटलं होतं.

हिऱ्याच्या कुड्यांचा ‘तो’ किस्सा

या दोघांच्या लग्नाचा ५२ वा वाढदिवस झाला तेव्हा रमेश देव यांनी सीमा देव यांना हिऱ्याच्या बांगड्या भेट दिल्या होत्या. त्यावेळी सीमा देव म्हणाल्या होत्या की आमचे हे (रमेश देव) मला ज्वेलर्सकडे घेऊन गेले तिथे मला म्हणाले उद्या मी तुझ्याबरोबर असेन की नाही मला माहित नाही. त्यामुळे आज तुझ्यासाठी हे महाग गिफ्ट मला घेऊ देत. असं मला भावनिक करुन त्यांनी हिऱ्याच्या बांगड्या घेतल्या. त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मला हिऱ्याच्या कुड्या घेतल्या होत्या ज्या मी आजही वापरते आहे असंही सीमा देव यांनी लग्नाच्या ५२ व्या वाढदिवशी सांगितलं होतं. रमेश देव यांचं निधन मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झालं. तर आज सीमा देव यांची प्राणज्योत आज मालवली. मात्र त्यांची प्रेमकहाणी, त्यांनी अभिनयात घालून दिलेला आदर्श हा येणाऱ्या पिढ्यांना शिकवण देणारा असेल यात काहीही शंका नाही.

Story img Loader