नेटफ्लिक्सचा शो ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या शोचा दुसरा सीझनही नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्यामध्ये सीमा सजदेह, महीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी दिसत आहेत. दुसरा सीझन खूपच मजेशीर आहे आणि या सीझनमध्ये पहिल्याच्या तुलनेत बोल्डनेसची पातळीही वाढवण्यात आल्याचं लक्षात येत आहे. नव्या सीझनमध्ये या सर्वजणी अनेक मोठे खुलासे करताना दिसणार आहेत. दरम्यान, भारतीय मॅचमेकिंग सीमा तपारियानेही या शोमध्ये एंट्री केली, तिच्याशी बोलताना सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेहने असं काही वक्तव्य केलं की सर्वांनाच धक्का बसला.
सीमा तपारियाने शोच्या एका भागात पाहुणी म्हणून हजेरी लावली. यावेळी, सीमा तपारिया आणि सीमा सजदेह यांच्यात वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं झालं आणि सीमा तपारियाने सीमा सजदेहला अनुरुप जोडीदार शोधण्याचा सल्ला दिला. सीमा तापरियाने सीमा सजदेहला, “२२ वर्षांनंतर सोहेलला घटस्फोट का दिला?” असा प्रश्न विचारला. याचं उत्तर देताना सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा म्हणाली, “आमचे विचार जुळत नाहीत.” यावर सीमा तपारियाने पुन्हा, “हे कळायला २२ वर्षं का लागली?” असा प्रश्न सीमा सजदेहला विचारला.
आणखी वाचा- ‘बाहुबली’साठी राजामौलींनी हॉलिवूड चित्रपटांतून चोरले तब्बल ३६ सीन्स? ‘या’ व्हिडिओतून फुटलं बिंग
सीमा तपारियाच्या प्रश्नाचे उत्तर देताना सीमा सजदेहनं असं काही वक्तव्य केलं की, ते ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. ती गमतीने म्हणाली, “मला मुली आवडतात” आणि स्वतःच्या बोलण्यावर ती जोरात हसायला लागली आणि तिने पुन्हा विचारलं, “तुम्ही माझ्या उत्तराने घाबरलात का?” मात्र, हे ऐकल्यानंतर सीमा तपारियाच्या चेहऱ्यावरील भाव बदललेले दिसून आले.
आणखी वाचा-“लग्नानंतरही संजय कपूरचं अफेअर…” पत्नी महीपचा धक्कादायक खुलासा
आता सीमा सजदेहने हे सर्व गमतीने म्हटल्यानंतर, महीप कपूरने सीमा सजदेहचा हा विनोद पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणाली “सीमा सजदेहसाठी तुला वधू सापडेल का?” यावर स्पष्टपणे नकार देत सीमा तपारिया म्हणाली, “भारतात सध्या इतका मोकळेपणा किंवा पुढारलेले विचार नाहीत की या गोष्टी इथे घडू शकतील. यावर नंतर विचार करू.” दरम्यान या शोमध्ये या चार अभिनेत्रींचं खरं आयुष्य दाखवण्यात आलं आहे.