सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान हे तिघंही भाऊ सतत चर्चेत असतात. सलमानबरोबर सोहेल, अरबाजचं खासगी आयुष्य चर्चेत असतं. अरबाज आणि मलायका अरोराने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काही महिन्यांपूर्वी सोहेलने देखील पत्नी सीमा सजदेहबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा २४ वर्षांच्या संसाराचा दि एण्ड झाला. आता सीमाने त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.
आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या
सोहेल आणि सीमा यांच्यामध्ये अगदी घट्ट नातं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक मताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघांनीही त्यांच्या या निर्णयावर बोलणं टाळलं. पण बॉलिवूड बबला सीमाने दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे. सीमा म्हणाली, “घटस्फोटाच्या विचारामध्ये मी गुंतून राहिली नाही. त्याऐवजी मी वेगळा निर्णय घेतला. त्यामुळेच मी माझ्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकले.”
“मी माझ्या आषुष्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्यास सुरुवात केली आहे. नकारात्मक गोष्टी मी माझ्यापासून दूर केल्या आहेत. लोकांना माहित आहे की सीमा कोण आहे? माझे कुटुंबीय, मुलं, भाऊ-बहिण आणि माझ्या आजुबाजूच्या लोकांना माहित आहे की मी कोण आहे?. मी स्वतःबरोबर अगदी खरेपणाने वागणार आहे. मी चेहऱ्यावर मुखवटा लावून वावरत नाही.”
आणखी वाचा – ऋषभ पंत, उर्वशी रौतेलामधील वाद काही संपेना, अभिनेत्री म्हणाली, “मी माझी बाजू मांडली नाही आणि… “
सोहेल खान आणि सीमा खान १९९८ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. सीमा आणि सोहेल यांची पहिली भेट अभिनेता चंकी पांडे याच्या साखरपुड्या दरम्यान झाली होती. सोहेल आणि सीमा या दोघांचाही धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नावेळी बऱ्याच अडचणी आल्या होत्या. मात्र आता लग्नाच्या २४ वर्षानंतर त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.